http://swamikrupa.org
विशेष सवलत योजना
http://swamikrupa.org


सन 2001 पासून आम्ही प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहोत. ग्रंथ वितरण ते ग्रंथ प्रकाशन अशी वाटचाल करताना आम्ही ग्रंथनिर्मितीशी संबंधित सर्वच घटकांशी जोडलेलो आहोत.

सन 2010 मध्ये, व्यवसायाचा विस्तार करण्याच्या हेतूने आम्ही पुनर्वसु प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून केवळ धार्मिक/आध्यात्मिक स्वरूपाची ग्रंथ निर्मिती करण्याचे व सांजशकुन प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून ललित साहित्य प्रकाशित करण्याचे निश्चित केले.
पुनर्वसु प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्वप्रथम श्रीगजानन महाराज चरित्र कोश हा वाचकप्रिय संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केला तसेच अक्कलकोटस्थ श्रीस्वामीसमर्थ, श्रीमाणिकप्रभू, श्रीगोंदवलेकर महाराज अशा विविध संतसत्पुरुषांची दुर्मिळ चरित्रे नव्या स्वरूपात प्रसिद्ध केली. या सर्वच ग्रंथांना विलक्षण वाचकप्रियता लाभलेली आहे.
सांजशकुन प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध विषयांवरील पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत. त्यासोबतच दरवर्षी सांजशकुन हा दिपावली वार्षिक ग्रंथही प्रकाशित केला जातो.
श्रीस्वामीकृपा आर्ट गॅलरी संस्थेच्या माध्यमातून मान्यवर कलाकारांनी साकारलेली विविध संतसत्पुरुषांची रेखाचित्रे, तैलचित्रे तसेच शिल्पाकृती वाजवी दरात वितरित केल्या जातात.

सन 2011 पासून अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थ महाराजांवरील संशोधन ग्रंथरूपाने प्रसिद्ध व्हावे या संकल्पनेतून श्रीस्वामीकृपा हा वार्षिक ग्रंथ प्रसिद्ध करण्यात येतो. उत्तम दर्जाचे सादरीकरण व देखणे निर्मितिमूल्य लाभलेल्या या संशोधनपर वार्षिक ग्रंथाने अल्पावधीतच श्रीस्वामीसमर्थ संप्रदायामध्ये स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे.

लेखन, संपादकीय विभागाची जबाबदारी विवेक दिगंबर वैद्य यांच्याकडे असून ग्रंथनिर्मिती, व्यवस्थापन, वितरण विभागाची जबाबदारी सई विवेक वैद्य यांच्याकडे आहे. ग्रंथ-मुद्रणाशी संबंधित डीटीपी, डिझाईनिंग या सेवा अदिती क्रिएशन संस्थेच्या माध्यमातून दिल्या जातात. तसेच, पुणे विभागाचे व्यवस्थापन, वितरण अभिषेक कराळे यांच्या द्वारे पाहिले जाते.