Click on book cover for preview
MAULI_CHITRA GRANTH
Offer: ₹ 600.00
Title | 'माउली' श्रीगजानन महाराज |
Author | विवेक दिगंबर वैद्य |
Category | चित्र ग्रंथ |
ISBN | 978-81-939190-4-0 |
Pages | 120 पृष्ठे |
Size | रॉयल एडिशन |
Book Price | 1200 रुपये |
Discounted Price | 600 रुपये |
श्रीगजानन महाराज ...
आपण जसे पाहतो तसे नाहीत. श्रीमहाराजांचे रूप-स्वरूप आगळेवेगळे आहे, पूर्णतः निराळे आहे. खरे पाहता, श्रीमहाराज हा अभ्यासाचा विषय आहे. मात्र, त्यांच्याकडे संशोधक किंवा समिक्षकाच्या दृष्टिकोनातून न पाहता समर्पित भक्तिभावाने पाहिले पाहिजे.
श्रीमहाराजांचे रूप, त्यांचा स्वभाव, त्यांची आवड-निवड, त्यांचे विचार आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आणि... तसा प्रयत्न आम्ही या चित्रमय चरित्रग्रंथाच्या माध्यमातून करीत आहोत.
श्रीगजानन महाराजांच्या अवतारकार्यातील विविध प्रसंगांमधून निवडलेल्या त्यांच्या वृत्तीच्या, स्वभावाच्या, देहबोलीच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या अनेकरंगी छटा आम्ही रंग-रेषा-शब्द आणि सादरीकरणाच्या माध्यमातून हळुवारपणे उलगडण्याचा प्रयत्न करीत आहोत. श्रीमहाराजांच्या अवतारकार्याचे "भाव' दर्शन घडविण्याचा हा म्हटले तर भाबडा आणि म्हटले तर, "डोळस' प्रयत्न आहे.
आमचा हा प्रयत्न आपणां सर्वाना, "श्रीमहाराजांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देईल' असा विश्वास आहे.
विवेक दिगंबर वैद्य, पराग घळसासी |